Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
२३ मोरांना विष देऊन मारण्यात आल्याची धक्कादायक घटना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/new-19.png)
राजस्थान | महाईन्यूज |
राजस्थानमध्ये तब्बल २३ मोरांना विष देऊन मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी एका शेतकऱ्याकडूनच या मोरांवर विष प्रयोग केला गेल्याचे समोर आले आहे.
राजस्थानमधील बिकानेर येथील सेरूना गावात ही घटना घडली आहे. दिनेश कुमार असं या शेतक-याचे नाव असून , मोरांमुळे होणार पिकांचे नुकसान टाळण्यासाठी या शेतक-याने या मोरांवर विषप्रयोग केला. यामध्ये 23 मोरांचा मृत्यू झाला. त्याने केलेल्या या क्रुर कृत्याबद्दल आरोपी दिनेश कुमार याला अटक करण्यात आली आहे. वन विभागाचे सहायक वनसंरक्षक यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच २३ मोरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत.