IPL 2020 साठी कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव सुरू, पॅट कमिन्स ठरला सर्वात महाग खेळाडू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/8.png)
कोलकाता | महाईन्यूज |
IPL 2020 साठी कोलकाता येथे खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. यावेळी लिलावात एकूण 73 खेळाडूंचा लिलाव होत आहे. यापैकी 29 खेळाडू विदेशी आहेत . दोन कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात सात खेळाडू आहेत. तर दीड कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या गटात 23 खेळाडू आहे .
अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत 20 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 183 खेळाडू, 40 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 7 खेळाडू आणि 30 लाख मूळ किंमत असलेल्या गटात 8 खेळाडूंचा समावेश आहे. जे खेळाडू कसोटी, वनडे आणि टी-20 मधील कुठल्याही प्रकारात आपल्या देशासाठी खेळले असतील ते कॅप्ड श्रेणीत येतात आणि जे खेळाडू देशाकडून खेळले नसतील ते अनकॅप्ड श्रेणीत येतात.
यावेळी लिलावात अनकॅप्ड खेळाडूंना तीन वेगवेगळ्या बेस प्राईसमध्ये ठेवण्यात आलं आहे. यामध्ये 20 लाख, 30 लाख आणि 40 लाख या तीन श्रेणी आहेत. याआधी या 10 लाख, 20 लाख आणि 30 लाख होत्या. कॅप्ड खेळाडूंसाठी 5 वेगवेगळ्या बेस प्राईस ठरवण्यात आल्या आहेत. यामध्ये 50 लाख, 75 लाख, 1 कोटी, 1.5 कोटी आणि दोन कोटी या श्रेणी ठेवण्यात आल्या आहेत.
राजस्थान रॉयल्सने रॉबिन उथप्पाला 3 कोटीमध्ये विकत घेतलं.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/1-4.png)
सनरायझर्स हैदराबादने विराट सिंहला 1 कोटी 90 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/5.png)
वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलला पंजाबने 8.50 कोटीमध्ये विकत घेतलं.दिल्ली कॅपिटल्सने एलेक्स कॅरीवर 2.40 कोटींची बोली लावली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/2-6.png)
नॅथन कल्टर नाईलला मुंबई इंडियन्सने 8 कोटीमध्ये विकत घेतलं.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/6.png)
न्यूझीलंडचा वेगवाग गोलंदाज टिम साउदीवर बोलीच लागलेली नाहीये..भारताच्या पियूष चावलावर सीएसकेकडून 6.75 कोटींची बोली लावण्यात आलीये.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/3-4.png)
आतापर्यंत झालेल्या लिलावात पॅट कमिन्स सर्वात महाग खेळाडू ठरला. त्याला केकेआरने 15.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग विदेशी खेळाडू ठरलाय.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/7.png)