मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारण
‘कपूर एंड सन’ फॅमिलीच्या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंची हजेरी
सध्या कपूर कुटुंबामध्ये लग्नाचा माहोल असून लवकरच अरमान जैन आणि अनिस्सा मल्होत्रा विवाहबंधनात बांधले जाणार आहेत.
अलिकडेच अरमान आणि अनिस्सा यांचा रोका सोहळा पार पडला.या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या.यावेळी बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुप्रिया सुळेंसोबत फोटो काढले.
सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या सोहळ्यातील काही फोटोही शेअर केले आहेत.