नागपूर हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांच आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/1.png)
नागपूर | महाईन्यूज |
नागपूर हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींनी सावरकरांबाबतच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी भाजपने लावून धरत आंदोल न केलं यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक अत्यंत आक्रमक झाले होते. ‘सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा धिक्कार असो’ ‘स्वातंत्र्यवीर सावरकर का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा भाजप आमदारांनी दिल्या. भाजपच्या सर्व आमदारांनी ‘मी सावरकर’ नावाच्या भगव्या टोप्या घातल्या होत्या.सावरकरांशी संबंध काँग्रेसने तोडला असेल, देशातील जनतेने सावरकरांशी संबंध तोडलेला नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख ‘रेप इन इंडिया’ केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर काँग्रेसच्या ‘भारत बचाओ’ रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. “मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे”, असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.