मनोरंजन

रिंकुचा नवा ‘मेकअप’ प्रेक्षकांना घालतोय भुरळ

रिंकू राजगुरुच्या बहुचर्चित ‘मेकअप’ सिनेमाचा टीझर आतानुकताच प्रदर्शित झाला आहे.या ट्रेलरमध्ये रिंकुचा नवा आणि एक हटके बोल्ड असा लुक पहायला मिळतोय. ट्रेलरमध्ये रिंकू साडीपासून ते वेर्स्टन आऊट फिटमध्ये दिसतेय. ट्रेलरमधल्या “हर देवदास की गर्लफ्रेंड पारु नही होती” या डायलॉगमुळे मेकअप मधला रिंकूची हटके आणि बिंधास्त भुमिका असल्याचं दिसून येत आहे.

रिंकूसोबत ट्रेलरमध्ये चिन्मय उद्गीरकरसुद्धा दिसतोय. मात्र तो यात कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मेकअपचा टीझर पाहून हा सिनेमा खूपच रंजक असल्याची प्रतिक्रिया चाहते देत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश पंडितने केले आहे. 7 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर खूप सक्रिय झाली आहे. तिचे फोटो असो किंवा मग व्हिडीओ ती नेहमीच आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असते. तिने लवकरच मराठी नाटक पाहण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. मराठी रंगभुमिबाबत एक वेगळच आकर्षण असल्याचंही तिने सांगितलं आहे. सैराटनंतर रिंकुच्या मेकओव्हर नंतर तिचा मेकअपही प्रेक्षकांच्या मनावर काय जादू करणार हे पाहण खरोखरचं औत्सुक्याचे ठरणारे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group