Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
२१ हजार रुपयांच्या कांद्याची चोरी करताना दोघे अटकेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/KANDA-chori-MUMBAI-Frame-copy-2.jpg)
महाईन्यूज | मुंबई
जीवनावश्यक वस्तू असलेल्या कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने सध्या किरकोळ बाजारातील कांद्याच्या दाराची सर्वत्र चर्चा आहे. मोठा भाव आल्याने कांद्याच्या चोरीचे प्रकार घडताना दिसत आहेत. अशीच एक कांदा चोरीची घटना मुंबईतील डोंगरी भागात पाच दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेत चोरट्यांनी दोन दुकानांमधून तब्बल २१ हजार रुपयांचा कांदा चोरुन नेला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केलेली आहे.