स्वप्नीलचे यंदाचे ‘खास’ समर व्हेकेशन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/swapnil-joshi.jpg)
अभिनेता स्वप्नील जोशी यंदाचे समर व्हेकेशन कुटुंबीयांसोबत घालवत आहे. ‘रणांगण’ चित्रपटात गेली दोन वर्ष व्यग्र असलेल्याने त्याला बायको आणि मुलांना अधिक वेळ देता आला नव्हता, यामुळे या उन्हाळी सुट्टीत तो पूर्ण महिनाभर घरात व्हेकेशनचा आनंद घेणार आहे.
स्वप्नील म्हणाला की, कामामुळे मी सतत कुठे ना कुठे प्रवास करत असतो. यामुळे जर थोडा वेळ मिळाला तर मी सर्वात आधी घरचा रस्ताच धरतो. ‘रणांगण’ सिनेमाच्या चीत्रीकारणात आणि त्यानंतर त्याच्या प्रमोशन कार्यक्रमात खूप व्यस्त होतो. यामुळे माझ्या कुंटुबीयांना मी त्यांचा हक्काचा वेळ देऊ शकत नव्हतो. म्हणूनच आता काही मोकळा वेळ मिळाला असल्याने कुठे बाहेर जाण्यापेक्षा घरच्यांसोबत घरातच समर व्हेकेशनचा आनंद लुटण्याचा मी विचार केला आहे. माझ्यासाठी याच्यापेक्षा दुसरे चांगले व्हेकेशन असूच शकत नाही, असेही तो म्हणाला.