शहर आणि परिसरामध्ये गारवा पुन्हा वाढला
महाईन्यूज | पुणे
निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे शहरात पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. मात्र, दोन दिवसांत पुन्हा आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने तापमानात-चढ उतार होऊ शकतात, असा अंदाज पुणे वेधशाळेकडून देण्यात आलेला आहे.शहर आणि परिसरामध्ये गेल्या आठवडय़ामध्ये गारवा चांगलाच वाढला होता. रात्रीचे किमान तापमान १६ ते १७ अंशांपर्यंत खाली आलेले होते.
मात्र, या आठवडय़ात अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यानंतर निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीचा परिणाम म्हणून शहरात आकाशाची स्थिती ढगाळ झाली. त्यामुळे किमान तापमानात वाढ होऊन ते २० अंशांच्याही पुढे गेले होते. त्यामुळे थंडी गायब झाल्याती स्थिती होती. शुक्रवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. गुरुवारी रात्रीही निरभ्र आकाशाची स्थिती होती. त्यामुळे किमान तापामानात एकाच दिवसात २.८ अंशांची घट होत ते शुक्रवारी १७.९ अंशांपर्यंत खाली आले. त्यामुळे पुन्हा गारवा वाढला आहे.