breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगे यांचा पुरग्रस्तांकडून कृतज्ञता पत्र देवून गाैरव

सुभेदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निसर्ग सार्वजनिक वाचनालयाने दिले पत्र

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

कोल्हापूर – सांगली – सातारा जिल्ह्यात पुरग्रस्तांना नव्याने उभारी देण्यासाठी अखंड महाराष्ट्रातून अनेकांचे हात मदतीस सरसावले, त्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीही जीवनाश्यक वस्तूंसह गाईचे वाटप करत शेतक-यांना मदतीस हातभार लावला, यामुळेच पुरग्रस्त नागरिकांच्या वतीने आमदार लांडगे यांचा कृतज्ञता पत्र देवून गाैरव करण्यात आला आहे.

शिरोळ (जि.कोल्हापूर) येथील सुभेदार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निसर्ग सार्वजनिक वाचनालय मजरेवाडी यांच्यावतीने आमदार महेश लांडगे यांचा कृतज्ञता गाैरव करण्यात आला आहे. कोल्हापूर – सांगली – सातारा जिल्ह्यात 8 ते 14 आॅगस्ट 2019 रोजी पावसाच्या तडाख्याने शेतक-याचे शेतीचे प्रचंड नुकसान होवून संसार उध्दवस्त झाला होता. महापूराने सर्वत्र हाहाकार माजला अनेकांची जनावरे पुरात वाहून गेली. काही पूरग्रस्त व बाधिताना जीव गमवावा लागला. यातून पुरग्रस्तांना नव्याने उभारी देण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो हात मदतीस धावले.

अन्न, पाणी, वस्त्र यासह मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यास सर्वांनी हातभार लावला. त्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुरग्रस्त व बाधितांना जवळपास 120 ट्रक जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा, 36 गाईच्या स्वरुपात मदत केली. त्याच्या मदतीमुळे पुरग्रस्त गाव नव्याने उभे राहिले. त्यांनी केलेली मदत शब्दांत व्यक्त करता येत नाही. त्यामुळे आमदार महेश लांडगे, कार्तिंक लांडगे, प्रसाद कुलकर्णी त्यांचे असंख्य सहकारी यांचे आम्ही अॅड अमर बुबनाळे, शांतीनाथ कोटे, विनायक नरुटे आणि समस्त मजरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या बद्दलची कृतज्ञता ही पत्रातून व्यक्त करुन गाैरव करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button