Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
एलओसीनजीक हिमस्खलन, चार जवान शहीद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/mount-frame.jpg)
महाईन्यूज | काश्मीर
काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या हिमस्खलनात चार जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमधील कुपवाडा आणि बांदीपोरा जिल्ह्यात झालेल्या हिमस्खलनाच्या घटनांमध्ये चार जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, लष्कराकडून शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे.
बांदीपोरामधील गुरेज सेक्टर आणि कुपवाडा जिल्ह्यातील करनाह सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या दोन घटना घडल्या. १८ हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर झालेल्या या हिमस्खलनामुळे चार जवान शहीद झाले असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराची हेलिकॉप्टर्स आणि बचाव पथकाकडून त्या जवानांचा शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आलं होतं.