देहूगावात विवाहितेला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/images-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून संगणमताने विवाहितेचा छळ करून तिला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजणक घटना देहूगावात घडली. याप्रकरणी सासरच्या पती, सासू आणि ननंद या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पती शाम गजानन वाघमारे (वय 24), सासू शोभा गजानन वाघमारे (वय 60), ननंद दीपाली गजानन सुरवसे (वय 30, सर्व रा. देहुगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मोनाली शाम वाघमारे (वय 22, रा. यशोदानगर, इंदापूर) यांनी मंगळवारी (दि. 3) सायंकाळी पावनेसातच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनाली यांचा शाम यांच्याशी विवाह झाला. कुटुंबात सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना अचानकपणे घरातील सदस्यांनी मोनाली यांना त्रास सुरू केला. पती, सासू आणि ननंद या तिघांनी मिळून मोनाली यांना शिवीगाळ खरून त्यांचा शारिरीक आणि मानसिक छळ केला. त्यांचा गर्भपात देखील केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एवढेच काय तर त्यांना इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील झाल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.