breaking-newsमनोरंजन
बिग बॉसच्या घरातून ऋतूजा धर्माधिकारी बाहेर
बिग बॉसच्या घरात टास्कदरम्यान दुखापत होण्याच्या घटना वाढताना दिसून येत आहेत. बिग बॉसमधील स्पर्धक ऋतूजा धर्माधिकारीने शोमधून माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे. ‘रंग माझा वेगळा’ या टास्क दरम्यान ऋतूजाच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार देखील करण्यात आले.
मात्र, ‘हात फ्रॅक्चर झाल्यामुळं होणाऱ्या वेदना सहन होत नसून या वेदनांसह बिग बॉसच्या घरात राहणं अशक्य आहे. लहान-लहान गोष्टींसाठी मला इतरांवर अवलंबून राहावं लागत आहे.’ असं ऋतूजानं बिग बॉसला सांगितलं. त्यानंतर बिग बॉसनं तिची देखील तिच्या निर्णयाला संमती दर्शवली.