Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला

मुंबई | शिवरायांना वंदन करून उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक मजल्यावर अलोट गर्दी पाहायला मिळाली. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार असल्याने मंत्रालय सज्ज होते.

पोलिसांची सुरक्षाची नेहमीपेक्षा वाढवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे सहाव्या मजल्यावर जाऊन मुख्यमंत्री कार्यलयात मुंख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीबाबत अहवाल मागवला आहे. त्याबाबतही ते आज आढावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९वे मुख्यमंत्री ठरलेत. विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात ठाकरे परिवारातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्री झाली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button