breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पुणे-मुंबई महामार्गावर ट्रकने दोन मोटारींचा धडक
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
पुणे मुंबई महामार्गावर कासारवाडी येथे ट्रकने दोन मोटारींचा धडक दिली दोन्ही मोटारीचे मोठे नुकसान झाले आहे. एका मोटार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. कासारवाडी येथील कुंदन नगर येथे पुण्याकडील मार्गावर हा अपघात झाला.
मेट्रोचे काम सुरू असल्याने मुख्य रस्ता वाहतूकीस बंद आहे. सेवा रस्त्याने रहदारी सुरू आहे. याच ठिकाणी बीआरटी मार्ग सुरू होतो. बीआरटी मार्गाने जायचे की सेवा रस्त्याने या गोंधळात पुढील मोटार चालक असतानाच त्यामागील मोटारीने पुढच्या मोटारीला धडकली. मागोमाग असलेल्या ट्रकने दोन्ही मोटारींचा ठोकरले. त्यामुळे एका मोटारीची दिशा बदलून तिचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे पुण्याकडील मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.