गृहपाठाचे कारण सांगून थांबविले, क्लासचालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
![Unnatural atrocities on an eleven-year-old boy in Alandi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/crime-2.jpg)
मुलीच्या आईकडून खडकी पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद
पुणे |महाईन्यूज|
खासगी शिकवणकीचा वर्ग सुटल्यानंतर एका शिक्षकाने दहा वर्षीय विद्यार्थिनीला गृहपाठाचे कारण सांगून थांबवत विनयभंग केल्याची घटना पुण्यातील खडकीत बुधवारी उघडकीस आली.
याप्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचारविरोधात बालकांचे संरक्षण आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. सदर घटना मंगळवारी संध्याकाळी घडली.
आसिफ युसूफ शेख (४८, रा. खडकी ,पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने खडकी पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीत शेखचा खासगी शिकवणकी असून त्याठिकाणी तो विद्यार्थ्यांना विविध विषयाचे मार्गदर्शन करतो. मंगळवारी वर्ग सुटल्यानंतर त्याने एका १० वर्षीय मुलीला गृहपाठाचे कारण देउन थांबविले. सर्व विद्यार्थी निघून गेल्यानंतर शेखने संबंधित विद्यार्थीनीचा विनयभंग केला. याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे अधिक तपास करीत आहेत.