काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे अखेर ठरलं, शिवसेनेला पाठिंबा देवून येणार महाशिव आघाडीचं सरकार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/FB_IMG_1573568044767.jpg)
मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यातच महाआघाडीची बैठक पार पडली. यावेळी सत्ता स्थापनेबद्दल महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. दरम्यान, काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. परंतू, काही गोष्टीवर चर्चा घडवून निर्णय घेणं बाकी राहिले आहे. त्यामुळे महाशिवआघाडीचे सरकार राज्यात येणार जवळपास निश्चित मानले जात आहे.
मुंबईतील वाय.बी.चव्हाण सभागृहात काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या महत्वपुर्ण जेष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. काल शिवसेनेने आम्हाला अधिकृतरित्या संपर्क साधून पाठींबा मागितला आहे. याबद्दल काही मुद्दे असे आहेत ज्यावर अधिक चर्चेची गरज असल्याची गरज दोन्ही पक्षांना वाटते. त्यामुळे आता याबाबत अधिक व्यापक चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. दोघांचा निर्णय झाल्यानंतर शिवसेनेशी संपर्क साधला जाणार आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/FB_IMG_1573568047239.jpg)
दरम्यान, आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या या निर्णयामुळे आता शिवसेनेला देण्यात येणाऱ्या पाठींब्याचा निर्णय लवकरच पाहावयास मिळणार आहे. या बैठकीत राज्यातले आणि देशातील मोठे नेते चर्चेला उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, नवाब मलिक हे उपस्थित होते. याच सोबत कॉंग्रेस कडून मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के सी वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते.