विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, गुप्तचर यंत्रणांनी दिली माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Virat-Kohli-Practice.jpg)
नवी दिल्ली – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेच्या हिटलिस्टवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच NIA च्या हाती यासंदर्भातली काही कागदपत्रे लागली आहेत. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
या लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याच यादीत सर्वात शेवटी विराट कोहलीचेही नाव आल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या यादीत विराट कोहलीचे नाव कोणत्या कारणामुळे आले याबद्दलची कोणतीही ठोस माहिती सुरक्षा यंत्रणांकडून समोर आलेली नाही. केरळ मधील कोझिकोड येथील, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या High Power