किवळे : विकासनगरमध्ये दिव्यांग मतदारांचे विक्रमी मतदान

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा मतदार संघ क्रमांक २०५ मधील विकासनगर किवळे येथील दिव्यांग बांधवांनी मतदान केंद्र ९ विझडम इंग्लीश मीडियम स्कूल विकासनगर किवळे येथे सकाळी साडेदहा ते साडेअकरा या वेळेत उत्सफुर्त मतदान केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांना त्यांचे घरापासून मतदान केंद्रापर्यंत वाहनाची (रिक्षा) व्यवस्था केली होती. दिव्यांग मतदारांना निवडणूक प्रक्रियेमध्ये समावून घेणे आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पिपंरी-चिंचवड महापालिका व नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश कि. शिंदे यांच्या प्रयत्नाने विकासनगर किवळे येथील सर्व दिव्यांग बांधवांनी मतदानामध्ये सहभाग घेतला.
यामध्ये स्वःता रमेश कि. शिंदे, राजू धनगर, भीमा डोंगरे, दशरथ पिंपळे, पंकज काशिद , लक्ष्मीबाई मदने, राजेश देशमुख, राजेंद्र वहीले, आलीम शहा इत्यादी दिव्यांग बांधवांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांग मतदारांना वाहन व्यवस्था व व्हिलचेअरची उत्तम व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांना मतदानात सहज सहभाग घेता आला. लोकशाहिने दिलेला आमचा मतदानाचा हक्क बजावल्याचे समाधान दिव्यांग बांधवांच्या चेहे-यावर दिसत होते. तसेच, रिक्षा चालक सलीम हुसेन शेख यांनी सुध्दा प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला बहुमोल केले.






