महाराष्ट्राचे एस. ए. बोबडे होणार देशाचे नवे सरन्यायाधीश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/71644507.jpg)
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ न्यायाधीश एस. ए. बोबडे हे देशाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस सरकारकडे केली आहे. बोबडे हे देशाचे ४७वे सरन्यायाधीश म्हणून १८ नोव्हेंबरला शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशाच्या नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यमान सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्याचवेळी त्यांनी देशाच्या नव्या सरन्यायाधीशांचं नाव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं समजतं. गोगोई यांनी न्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. तसं पत्र त्यांनी कायदा मंत्रालयाकडे पाठवलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून समजते. बोबडे हे महाराष्ट्रातील नागपूरचे आहेत. त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकिली केली आहे. मध्य प्रदेश हायकोर्टाचे ते न्यायमूर्ती होते.