पुण्याला पुन्हा पावसाने झोडपले, अनेक भागात साचले पाणी
पुणे |महाईन्यूज|
पुण्यात पावसाने पुन्हा हाहाकार माजविला आहे. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस शहर व परिसरात कोसळत आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
पुण्यावर १५ किलोमीटर उंचीचे जास्त घनतेचे ढग असून कमी वेळात जास्त पाऊस शक्य असल्याचं हवामान तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाऊस थांबेपर्यंत व पाणी ओसरेपर्यंत प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शहरातील सहकार नगर परिसरात रस्ते जलमय झाले असून रस्त्यावरील दुचाकी पूर्णपणे पाण्यात गेल्या आहेत.
पावसाने सिंहगड रोड भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तर संतोष हॉल येथील मधुकर हॉस्पिटलजवळ रस्त्यावर पाणी साचले, सनसिटी रोडवर अनेक झाडे कोसळली. सिंहगड रोड परिसर, वडगाव बुद्रुक, नऱ्हे परिसरात वीज पुरवठा बंद झाला आहे. शिवाजी रस्त्यावर पाणीच पाणी, संपूर्ण परिसर जलमय झाले आहेत. तर खडक पोलिस ठाण्यातही शिरले पाणी आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झाले आहे.