Breaking-newsराष्ट्रिय
‘पीडीपी’चे प्रतिनिधी मंडळ आज मेहबूबा मुफ्तींना भेटणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/mehbooba-mufti.jpg)
पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाचे (पीडीपी) एक प्रतिनिधी मंडळ सध्या श्रीनगरमध्ये स्थानबद्ध असलेल्या त्यांच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची सोमवारी भेट घेणार असल्याचे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
पीडीपीच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व पक्षाचे सरचिटणीस वेद महाजन करतील, असे पक्ष प्रवक्ते फिरदौस टाक यांनी पीटीआयला सांगितले. केंद्र सरकारने घटनेतील अनुच्छेद ३७०च्या तरतुदी रद्द केल्यानंतर ५ ऑगस्टला स्थानबद्ध करण्यात आलेल्या मेहबूबा मुफ्तींशी पक्षाच्या नेत्यांची ही पहिलीच भेट असेल. जम्मूतील पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाला मेहबूबा यांच्या भेटीची परवानगी द्यावी, अशी विनंती पीडीपीने राज्यपाल सत्यपाल मलिक यांना केली होती.