Breaking-newsआंतरराष्ट्रीय
ई-सिगरेटचे अमेरिकेत १८ बळी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/e-cigarate-2.jpg)
वॉशिंग्टन : ई-सिगरेटच्या व्यसनामुळे अमेरिकेत आतापर्यंत १०८० लोकांच्या फुफ्फुसात जखमा झाल्या असून १८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अमेरिकी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी म्हटले आहे की, ई-सिगरेटमुळे होणाऱ्या घातक परिणामातील हे हिमनगाचे केवळ टोक आहे. अमेरिकेतील लोकांमध्ये या सिगरेटने व्हेपिंग करण्याचे प्रमाण वाढले असून गेल्या आठवडय़ापासून २७५ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. गेल्या दोन आठवडय़ात ई-सिगरेटच्या व्हेपिंगने आजारी पडलेल्या व्यक्तींचे प्रमाण वाढले आहे.