आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादीने दिला ‘हा’ तगडा उमेदवार
मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज भरत असताना सर्वांचे लक्ष वरळी विधानसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने शिवसैनिकही मोठ्या उत्साहात प्रचाराला लागले आहेत. आदित्य ठाकरेंनीवरळी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आदित्यला पाठिंबा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही वरळी मतदारसंघातून पक्षाचा उमेदवार दिला नाही. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून या मतदारसंघातून बीआरएसपीचे नेते सुरेश माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी तिकीट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांच्या उपस्थितीत सुरेश माने यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे.