भाजपला धक्का, माजी आमदार माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीत करणार प्रवेश
नाशिक – भारतीय जनता पक्षाचे सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे. माणिकराव कोकाटे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते आहे. माणिकराव कोकाटे हे सिन्नरचे मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर मराठा समाजाचा चेहरा म्हणून माणिकराव कोकाटे यांच्याकडे सिन्नर तालुक्यात बघितले जाते. आता त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का मानला जात आहे.
माणिकराव कोकाटे काँग्रेसमध्ये असताना नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र भारतीय जनता पार्टीत माणिकराव कोकाटे यांनी प्रवेश केल्यानंतर सिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली होती. आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांना तिकीट नाकारल्याने माणिकराव कोकाटे यांनी भारतीय जनता पार्टीला सोडून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.