चीनमध्ये ट्रक-बसचा भीषण अपघात, 36 प्रवासी जागीच ठार
![Mumbai truck ramps on traffic police died](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/road-accident-1.jpg)
महाईन्यूज | प्रतीनिधी
चीनमध्ये ट्रक आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात किमान 36 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय या अपघातात अन्य 36 जण जखमी झाले आहेत. चीनच्या पूर्वेकडील जिआंगसू प्रांतात हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असणाऱ्या बसचा टायर पंक्चर झाल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चांगचुन-शेंजेन या एक्सप्रेस-वेवर झालेल्या या अपघातातील जखमींपैकी 9 जणांचा प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. तर अन्य 26 जण जखमी आहेत. याशिवाय अन्य एका जखमी प्रवासाला उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर लगेच अपघातस्थळी बचाव कार्याला सुरूवात करण्यात आली होती. जवळपास आठ तासांच्या बचाव कार्यानंतर चांगचुन-शेंजेन हा एक्सप्रेस-वे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
चीनमध्ये सर्रास वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं जातं, त्यामुळे अपघातांचं प्रमाण अधिक आहे. एका अहवालानुसार 2015पासून आतापर्यंत 58 हजार लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे.