breaking-newsमनोरंजन

मास्टरब्लास्टने लतादीदींना अनोख्या पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 90 वा जन्मदिन आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड पासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेदेखील अनोख्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने एका व्हिडीओ संदेशाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केली.

सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 1.25 मिनिटांचा एक व्हिडीओ शेअर करत लता मंगेशकर यांना टॅग केला आहे. तसंच यावर त्यांने लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचंही लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये त्याने लतादीदींबरोबच्या आठवणींनादेखील उजाळा दिला आहे. जेव्हा मी लहान असताना माझ्या आईच्या कुशीत झोपायचो तेव्हापासून मी तुमची गाणी ऐकत आलो आहे. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू तर तुमचं पहिलं गाणं कधी ऐकलं हे मला आठवत नाही, असंही तो यामध्ये सांगताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button