मिलेगा… करारा जवाब मिलेगा – खासदार डाॅ. अमोल कोल्हे
‘आय सपोर्ट शरद पवार साहेब’ सोशल मीडियातून मोहीम
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात आला. तर राज्यभरात निदर्शने करण्यात येत आहेत. यावर शिरुरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्विटर वरून मुख्यमंत्र्यासह भाजपावर टीका केली आहे.
‘ईडी’चा कुटील डाव न समजायला माणसं काही येडी नाहीत, मिलेगा… करारा जवाब मिलेगा असं ट्विट करुन ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. तसेच आय सपोर्ट शरद पवार साहेब ही मोहीम सोशल मीडियावर राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या आरोपासह मंगळवारी ईडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवार यांच्यासह अन्य ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.