Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भाजपाच्या विजय संकल्प बैठकीला पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती !

●भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे . पी . नड्डा यांनी केले मार्गदर्शन –

◆ शहरातील दोन्ही आमदार , महापौरासह प्रमुख पदाधिका – यांची हजेरी

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी ।

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बुधवारी पुण्यात पश्चिम महाराष्ट्र मेळावा पार पडला. या मेळाव्याला पिंपरी – चिंचवडमधील भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी झाडून उपस्थिती लावली. पुण्यात आयोजित विजय संकल्प बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री व्ही. सतीश, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री बाळा भेगडे, खासदार गिरीश बापट, संजय पाटील, अमर साबळे, तसेच पुणे शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यासह पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, प्रदेश चिटणीस उमा खापरे, शहर संघटक अमोल थोरात आदी उपस्थित होते .

छत्रपती उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती . .

भाजपा अध्यक्षांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मात्र उपस्थिती दर्शवली नाही. या मेळाव्याला हर्षवर्धन पाटील, रणजित मोहिते पाटील, धनंजय महाडिक अन्य पक्षातन भाजपामध्ये आलेल्या दिग्गजांनी हजेरी लावली असताना छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित न राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे .

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button