Breaking-newsपिंपरी / चिंचवड
पिंपरीत दहा लाखांचा गुटखा जप्त, एकाला केली अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/000_6_2781769_835x547-m.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखुची टेम्पोमधून विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून पोलिसांनी त्यांच्याकडून गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखु आणि एक टेम्पो असा एकुण १० लाख ३३ हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (दि.१) सकाळी साडेसातच्या सुमारास पिंपरीतील पवनेश्वर मंदिर चौकात केली.
खेमचंद रामचंद कृपलाणी (वय ५०, रा. खोली क्र.४, कापसे आळी, अशोक थेटरजवळ, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार दिनेश तुलसीम तीरथाणी (रा. पिंपरी) हा अद्याप फरार आहे. या दोघांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक निकम तपास करत आहेत.