Breaking-newsमनोरंजन
’रेस 3 चित्रपटातील पहिले गाणे रिलीज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/race-3-song-salman-khan-.jpg)
सलमान खानचा आगामी ‘रेस 3’ सिनेमा येत्या ईदला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘रेस 3’ चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला त्यापाठोपाठ आता या सिनेमाचे पहिले गाणे रिलिज करण्यात आले आहे. ‘रेस 3’ चित्रपटातील हिरिए हे गाणे नुकतच रिलीज करण्यात आले आहे.
सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे डिस्कोमधील आहे. ‘हिरिये’ या गाण्यामध्ये जॅकलीन पोल डान्स करताना दिसत आहे. सलमान खानही या गाण्यामध्ये खास अंदाजात थिरकताना दिसत आहे. रेमो डिसुझाने ‘रेस 3’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.