Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; CSMTच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/local-1.jpg)
कॉटनग्रीन-शिवडीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे एक लोकल गाडी थांबल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक खोळंबली आहे. ऐन गर्दीच्यावेळी हार्बर मार्गावरील पनवेल-सीएसएमटी लोकल सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून या दोन स्थानकांदरम्यान बंद पडली आहे. यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावर खोळंबा झाला आहे. रेल्वेचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले असून तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.