Breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे
संजीव पुनाळेकर यांना जामीन मंजूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/70092108.jpg)
पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर यांना पुणे येथील विशेष न्यायालयाने आज ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
सीबीआय कार्यालयात सोमवार व गुरुवारी हजेरी लावावी, परवानगीशिवाय परदेशात जावू नये, साक्षीदारावर दबाव आणू नये, सीबीआय बोलावेल त्यावेळी चौकशीसाठी हजर राहावे, अशा अटींवर विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी पुनाळेकर यांना जामीन मंजूर केला. पुनाळेकर यांच्यावतीने अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप ठेवून संजीव पुनाळेकर यांना २५ मे रोजी अटक करण्यात आली होती.