breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
नितेश राणेंची दादागिरी, अभियंत्याला शिवीगाळ करत अंगावर ओतलं चिखलाचं पाणी
कणकवली – कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी चौपदरीकरणाचं काम सुरू असलेल्या मुंबई – गोवा हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायाला मिळत आहे. काही ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना देखील घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
मुंबई – गोवा हायवे चौपदरीकरणाच्या कामाची दखल कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी घेतली असून त्यांनी थेट आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांना यांच्या अंगावर चिखलाचे पाणी ओतले. त्यानंतर अभियंते प्रकाश शेडेकर यांना खांबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न देखील केला. मागील काही दिवसांमध्ये कोकणातील मुसळधार पावसामुळे मुंबई – गोवा हायवेवरील प्रवास धोक्याचा झाला आहे. रस्ते खचल्याच्या घटना देखील समोर येत आहेत. याची दखल घेत नितेश राणे यांनी हायवे अभियंत्याला जाब देखील विचारला.