breaking-newsराष्ट्रिय
मुख्याध्यापिका पत्नीची शाळेत जाऊन हत्या
पैसे नाकारल्याने कुऱ्हाडीने वार
गोंदिया : गोंदिया तालुक्याच्या र्ईी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिकेची तिच्या पतीनचे शाळेत जाऊन मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास हत्या केली. प्रतिभा दिलीप डोंगरे (५१) रा. ग्राम दतोरा ता. गोंदिया असे मृत मुख्याध्यापिकेचे नाव आहे.
प्रतिभा व दिलीप डोंगरे यांचा नेहमी आर्थिक कारणावरून वाद घडायचा. पती बेरोजगार असल्याने प्रतिभा नेहमी पैसे द्यायची. सोमवारच्या रात्रीही दोघांत चांगलाच वाद झाला होता. पैसे देण्यास नकार दिल्याने दिलीप दतारोहून पाच किलोमीटर अंतरावरील र्ईी येथील शाळेत आला व मुख्याध्यापिकेचा कक्ष गाठून कुणाला काही कळायच्या आतच पत्नीवर सपासप कुऱ्हाडीने वार केले. पैसे देण्या-घेण्यावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी दिली.