Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

ग्लेन फिलिप्सचे वादळी शतक; न्यूझीलंडचा भारतावर ८७ धावांनी ऐतिहासिक विजय!

India vs New Zealand | चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारतीय संघाचा ८७ धावांनी दारुण पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार श्रेयस अय्यरचा निर्णय पूर्णपणे अंगलट आला. ग्लेन फिलिप्सचे स्फोटक शतक (१०७) आणि मायकेल ब्रेसवेलच्या अर्धशतकाच्या (६५) बळावर न्यूझीलंडने २० षटकांत २५९ धावांचा महाकाय डोंगर उभारला. हा टी-२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध कोणत्याही संघाने उभारलेला सर्वोच्च धावसंख्या ठरला. प्रत्युत्तरात, २५० हून अधिक धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि संपूर्ण संघ १७२ धावांवर गारद झाला.

पहिल्याच षटकात टिम सायफर्टची विकेट घेत भारताने चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन फिलिप्सने अवघ्या ४९ चेंडूंत १० षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने १०७ धावांची तुफानी शतकी खेळी केली. त्याला मायकेल ब्रेसवेलने अप्रतिम साथ दिली; ब्रेसवेलने अवघ्या २५ चेंडूंत ६ षटकार आणि ४ चौकारांसह ६५ धावा कुटल्या. या दोघांनी अवघ्या ४० चेंडूंत ११५ धावांची विस्फोटक भागीदारी रचून भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली.

हेही वाचा

पुणे-सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा मृत्यू, एक जखमी

भारतीय गोलंदाजांची धुलाई

भारताच्या सर्वच प्रमुख गोलंदाजांना किवी फलंदाजांनी टार्गेट केले. नितीश कुमार रेड्डीने ४ षटकांत ५४ धावा दिल्या, तर अक्षर पटेलने ३ षटकांत ४३ धावा मोजल्या. प्रिन्स यादव (४९ धावा), मयंक यादव (४८ धावा) आणि अर्शदीप सिंग (३८ धावा) हे सर्वच महागडे ठरले.

भारतीय डावाची दाणादाण; आघाडीचे फलंदाज ढेपाळले

२६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. डावाच्या पहिल्याच षटकात संजू सॅमसन आणि इशान किशन (शून्य) लागोपाठ बाद झाले. अभिषेक शर्मा (२७) आणि श्रेयस अय्यर (२२) यांनी सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र पॉवरप्ले संपण्याआधीच दोघेही माघारी परतले. मधल्या फळीत अक्षर पटेल (७), नितीश कुमार रेड्डी (२१), नमन धीर (१३ चेंडूंत २८) आणि उपकर्णधार तिलक वर्मा (३५) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; परंतु किवी गोलंदाज जेकब डफीने अचूक मारा करत ४ षटकांत २३ धावा देऊन ४ बळी टिपले आणि भारताचा डाव १७२ धावांवर संपवला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button