Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्सचा नवा मुख्य प्रशिक्षक; MI कडून मोठी घोषणा

Kieron Pollard | इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) इतिहासात विक्रमी पाच जेतेपदे पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आगामी हंगामासाठी नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. संघाच्या प्रत्येक जेतेपदात मोलाची भूमिका बजावणारा वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याच्यावर संघ व्यवस्थापनाने ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलार्डची आता मुख्य प्रशिक्षकपदी पदोन्नती करण्यात आली असून, तो श्रीलंकेचे दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने यांची जागा घेणार आहे.

कायरन पोलार्डच्या या नियुक्तीमुळे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्सशी असलेली त्याची दीर्घकालीन नाळ अधिक घट्ट झाली आहे. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. संघाची संस्कृती, कार्यपद्धती आणि यशाची समीकरणे त्याला अत्यंत जवळून ठाऊक असल्याने, मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाला पुन्हा विजेतेपदाच्या शिखरावर नेण्यासाठी तो सर्वात योग्य दावेदार मानला जात आहे. आयपीएलमधून निवृत्त झाला असला तरी जागतिक स्तरावरील विविध टी-२० लीग स्पर्धांमध्ये पोलार्ड अद्यापही सक्रिय खेळाडू म्हणून मैदानात उतरत असल्याने आधुनिक टी-२० क्रिकेटच्या बदलत्या डावपेचांची त्याला सखोल जाण आहे.

हेही वाचा

पथनाट्यातून स्वच्छतेचा जागर..ताथवडेतील विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश..

कायरन पोलार्डच्या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त करताना मुंबई इंडियन्सच्या सहमालक नीता अंबानी म्हणाल्या, “पोलार्ड अवघ्या २२ व्या वर्षी मुंबई इंडियन्स संघात दाखल झाला होता. गेल्या १६ वर्षांत तो आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनला आहे. खेळाडू म्हणून त्याने आम्हाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले, तर प्रशिक्षक म्हणून स्वतःचा दांडगा अनुभव आणि खेळाची सखोल समज त्याने संघासोबत वाटून घेतली आहे. मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान करण्याचे महत्त्व आणि ‘पलटन’साठी खेळण्याची जिद्द पॉलीला उत्तम ठाऊक आहे. नव्या भूमिकेतही तो तितक्याच आत्मविश्वासाने आणि निष्ठेने संघाचे नेतृत्व करेल, असा मला ठाम विश्वास आहे.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group