ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाचन प्रेरणा दिनानिमित्त पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

पिंपरी चिंचवड  : वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आळंदी येथील ग्रंथालय व संशोधन कक्षातर्फे दि. १६ ऑक्टोबर रोजी पदव्युत्तर (PG) विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. संशोधन लेखन आणि जबाबदार प्रकाशन पद्धती या विषयांवर आधारित दोन सत्रांचा या व्याख्यानमालेत समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक डॉ. बी. बी. वाफारे व उपसंचालक डॉ. अक्षद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.पहिल्या सत्रात डॉ. मीनल ओक ग्रंथपाल, एमईएस (MES) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस यांनी “संशोधनातील लेखन, नैतिकता आणि प्रकाशन” (Writing, Ethics, and Publishing in Research) या विषयावर मार्गदर्शन केले. प्रभावी संशोधन लेखनाची मूलतत्त्वे, संशोधनातील नैतिक आचरणाचे महत्त्व आणि शोधनिबंध प्रकाशनाची प्रक्रिया याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली. या सत्राला १३३ विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा –  शिंदेंच्या शिवसेनेला धक्का? अब्दुल सत्तारांचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत नवं समीकरण

दुसऱ्या प्रात्यक्षिक सत्रात डॉ. वृषाली दांडवते यांनी ग्रंथपाल, ए आयएसएसएमएस (AISSMS) कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे “प्रिडेटरी जर्नल्स : ओळख व त्यापासून बचाव आणि ओपन ॲक्सेस प्रकाशन” (Predatory Journals: How to Identify and Avoid Them & Open Access Publishing) या विषयावर मार्गदर्शन केले. प्रिडेटरी जर्नल्स कशी ओळखावीत, प्रकाशनातील सामान्य चुका कशा टाळाव्यात तसेच ओपन ॲक्सेस प्रकाशनाचे फायदे व संधी याविषयी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. या सत्राला ८३ विद्यार्थी उपस्थित होते. दोन्ही सत्रांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना महाविद्यालयाचे संचालक डॉ. डॉ. बी. बी. वाफारे म्हणाले, “वाचन ही संशोधनाची पहिली पायरी आहे. आजच्या स्पर्धात्मक काळात दर्जेदार संशोधनासोबतच संशोधनातील नैतिकता आणि योग्य प्रकाशन माध्यमांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. प्रिडेटरी जर्नल्सच्या वाढत्या धोक्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रवासासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. ग्रंथालय व संशोधन कक्षाने असे उपक्रम सातत्याने राबवावेत.” त्यांनी आयोजकांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल डॉ. राहुल बराथे व संशोधन अधिष्ठाता डॉ. वैशाली खेडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारिका पडवळ, आदर्श तांबे व सुवर्णा सानप यांनी सहकार्य केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button