ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

डॉ. बिरादार एच. डी. यांना प्रतिष्ठेचा ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’ पुरस्कार प्रदान

पुणे | डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, आकुर्डी, पुणे यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब म्हणजे डॉ. बिरादार एच. डी. यांची प्रतिष्ठेच्या ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६’ या पुरस्कारासाठी विजेते म्हणून निवड झाली आहे. त्यांना ‘सर्वोत्कृष्ट कनिष्ठ महाविद्यालय – राज्य मंडळ या श्रेणीमध्ये हा सन्मान मिळाला आहे.

ESFE आणि द टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हॉल क्रमांक ५, नेस्को, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे करण्यात आले होते.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, गुणवत्तापूर्ण शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी, शैक्षणिक उत्कृष्टतेसाठीचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य यांची दखल घेऊन हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

हेही वाचा

जपान दूतावास सहकार्याने पीसीसीओई मध्ये ‘नो जपान २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन

डॉ. बिरादार एच. डी. यांचे शैक्षणिक क्षेत्रातील समर्पण, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि उत्कृष्ट कार्य हे या गौरवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. हा पुरस्कार महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि प्रगतीशील वाटचालीची पावती ठरला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल डी. वाय. पी. कॅम्पसचे विश्वस्त श्री. तेजस पाटील सर, रिअर ॲडमिरल अमित विक्रम सर, मुख्य वित्त अधिकारी (CFO) श्री. बी. एच. शर्मा सर, तसेच महाविद्यालयातील सहकारी आणि शिक्षकवृंद यांनी डॉ. एच. डी. बिरादार सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button