रियाध विमानतळावर हुथी बंडखोरांचा भीषण क्षेपणास्त्र हल्ला; १२ ठार, ३०० हून अधिक जखमी

Riyadh Airport Houthi Attack | येमेनच्या हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाधजवळील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाला लक्ष्य करत भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान १२ जण ठार झाले असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या जनरल अथॉरिटी ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (GACA) शनिवारी झालेल्या या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली. मृतांमध्ये अमेरिकेसह विविध देशांतील नागरिकांचा समावेश असल्याने या हल्ल्याचे तीव्र आंतरराष्ट्रीय पडसाद उमटले असून, अमेरिकेने हुथींविरुद्ध लष्करी कारवाईत सहभागी होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
सौदी नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये चार सौदी नागरिक आणि दोन बांगलादेशी नागरिकांसह अमेरिका, जॉर्डन, पॅलेस्टाईन, सीरिया, सुदान व इजिप्तमधील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. हल्ल्यानंतर रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरच्या साहाय्याने जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयांत हलवण्यात आले. जखमींची संख्या ३०० च्या पार गेल्याने स्थानिक रुग्णालयांवर प्रचंड ताण आला असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
🚨 SHOCKING VISUALS FROM RIYADH, SAUDI ARABIA 🇸🇦
A missile attack by Iran-backed Houthi rebels from Yemen on King Khalid International Airport has left 12 people dead and over 300 injured, including a US citizen. 🇺🇸
Meanwhile, After Pakistan’s failure to help its umah brother, US President Donald Trump has hinted at joining Saudi strikes against the Houthis, saying: “We may. We’re going to look at it… We move very quickly.”
This isn’t distant crossfire anymore, it’s a full-scale international inferno. https://t.co/TfSPgNYTKY
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) October 11, 2026
हेही वाचा
दिल्लीतील आंदोलनाला नवे वळण; CJP नेते अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची जामिनावर सुटका
कोणतीही पूर्वसूचना न मिळता हा हल्ला थेट विमानतळावर धडकला; सौदी अरेबियाच्या सुरक्षा रडार व पूर्वसूचना यंत्रणेलाही या हल्ल्याचा वेळीच अंदाज आला नाही. चालू आठवड्यात किंग खालिद विमानतळावर झालेला हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता, तसेच धावपट्टीवर (टारमॅक) उभ्या असलेल्या एका व्यावसायिक विमानाचे अतोनात नुकसान झाले होते.
ट्रम्प यांचा हुथींवर हल्ल्याचा इशारा
या भीषण हल्ल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असून या घटनेला ‘भयानक’ म्हटले आहे. वॉशिंग्टन सौदी अरेबियासोबत थेट हुथींविरोधातील कारवाईत सामील होणार का, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, “आम्ही कदाचित सामील होऊ; आम्ही सर्व पर्यायांवर वेगाने विचार करत आहोत. आम्हाला नुकतीच या हल्ल्याची माहिती मिळाली आहे आणि आम्ही अत्यंत जलद गतीने निर्णय घेऊ.”
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध करत मारल्या गेलेल्यांमध्ये एका अमेरिकन नागरिकाचा समावेश असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.




