ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

MITACSC मध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १६० रक्तदात्यांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड :  MIT Arts, Commerce and Science College (MITACSC), आळंदी येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने तर्पण ब्लड बँक, विश्वराज हॉस्पिटल यांच्या सहकार्याने ३० सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल १६० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.या उपक्रमामध्ये विद्यार्थिनी, विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक डॉ बी बी वाफारे यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा –  सौरव गांगुलीच्या बायोपिकच्या पोस्टरवरून ट्रोलिंग; राजकुमार रावने मान्य केली चूक, म्हणाला ‘टीमने यातून धडा घेतला’

“रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. तरुण पिढीने अशा सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घ्यावा,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.तर्पण ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन केले. रक्तदानानंतर सर्व रक्तदात्यांना अल्पोपहार देण्यात आला तसेच प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.शिबिराचे नियोजन NSS कार्यक्रम अधिकारी प्रा,अरविंद वागस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. NSS स्वयंसेवकांनी नोंदणी, व्यवस्थापन आणि जनजागृतीची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी तर्पण ब्लड बँक, विश्वराज हॉस्पिटल यांचे वैद्यकीय पथक, महाविद्यालय प्रशासन आणि सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.महाविद्यालय व्यवस्थापनाने सर्व रक्तदात्यांचे आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले असून भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button