नूतन मध्ये एमबीए विद्यार्थ्यांचा ‘नूतन-दीक्षारंभ’ उत्साहात संपन्न

पिंपरी : नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तळेगाव दाभाडे येथील व्यवस्थापन अध्ययन विभागाच्या वतीने प्रथम वर्ष एमबीए विद्यार्थ्यांसाठी ‘नूतन-दीक्षारंभ’ इंडक्शन कार्यक्रमाचे नुकेतच आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला एलटीएम चे वरिष्ठ संचालक अभिजित पुरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे बिसनेज स्कुल चे संचालक डॉ. गणेश राव, अभियांत्रिकी चे सीईओ डॉ. रामचंद्र जहागीरदार संचालक डॉ. प्रमोद पाटील,एमबीए विभागप्रमुख डॉ. सुकन्या मेट्टा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे अभिजित पुरी यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात मजबूत व्यावसायिक नेटवर्क निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देताना “नेटवर्क ईज नेट वर्थ ” असे सांगितले आणि भविष्यातील करिअरच्या दृष्टीने प्रभावी नेटवर्किंग विकसित करण्याचे आवाहन केले.
डॉ. गणेश राव यांनी विद्यार्थ्यांना आपली स्वप्ने जिवंत ठेवण्याची आणि सातत्याने ज्ञान व कौशल्ये विकसित करण्याची प्रेरणा दिली. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करून सतत शिकत राहावे आणि स्वतःच्या क्षमतांचा विकास करावा, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – जरांगे यांच्या कोअर कमिटीतील सदस्याला वाळू उत्खनन प्रकरणात मोठा दणका; ४.९० कोटींचा दंड पुन्हा कायम
अभियांत्रिकी चे संचालक डॉ. प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आणि एमबीए च्या दोन वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचे आवाहन केले. तसेच संस्थेतील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधांचा प्रभावीपणे उपयोग करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
एमबीए विभागप्रमुख डॉ. सुकन्या मेट्टा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून एमबीए हा करिअरचा मार्ग म्हणून निवडल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात ज्ञान, कौशल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी अनुश कदम आणि ऋतुजा शेळके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मनोहर पवळे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. निखिल सिरभय्ये, प्रा. प्रतिभा सिंग आणि प्रा. रितेश फाळके यांनी नियोजन केले




