ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत तनिष्का शिंदेचे सुवर्णपदक; विभागीय स्पर्धेसाठी निवड

​ पिंपरी (विशेष प्रतिनिधी):

जलतरण तलाव हॉल, नेहरूनगर (पिंपरी) येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लांडेवाडी-भोसरी येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. तनिष्का हरिचंद्र शिंदे हिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ५८ किलोग्रॅम वजन गटात तब्बल १३२ किलोग्रॅम वजन उचलून तिने प्रथम क्रमांक पटकावला असून, या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिची शालेय वेटलिफ्टिंग विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

​तनिष्का ही इयत्ता १२ वी (वाणिज्य) मध्ये शिकत असून तिने यापूर्वीही राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. तिला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

हेही वाचा –  पिंपरी जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धा: राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ हॅटट्रिकसह प्रथम; मुलींच्या संघाला तृतीय क्रमांक

​ संस्थेकडून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव

​तनिष्काच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भोसरीचे प्रथम आमदार मा. श्री. विलासराव लांडे साहेब यांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

​त्याचप्रमाणे संस्थेचे खजिनदार व पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. अजितभाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव श्री. सुधीर मुंगसे सर, पिं.चिं. मनपाचे नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रांतदादा लांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ. अश्विनी चव्हाण, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा. योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तनिष्काचे मनापासून कौतुक केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button