ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

व्यक्तिमत्व विकासासाठी संवाद कौशल्य वाढवावे – डॉ. गोविंद कुलकर्णी

पीसीसीओई येथे प्रथम वर्ष बी.टेक विद्यार्थी स्वागत समारंभ संपन्न

पिंपरी, पुणे  :  महाविद्यालयीन काळात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अभ्यासक्रम बरोबरच शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून व्यक्तिमत्व विकासासाठी संवाद कौशल्य वाढवावे, स्व निर्णयक्षमता विकसित झाली की आत्मविश्वास देखील वाढतो. महाविद्यालयाच्या वतीने उपलब्ध केलेल्या विविध संधींचा सदुपयोग करावा आणि आपले करिअर घडवावे असे मार्गदर्शन पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले .

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील प्रथम वर्ष बी. टेक. च्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात यावेळी पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. के. राजेश्वरी, शैक्षणिक व सामाजिक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. लीना शर्मा, डीन डॉ. पी. ए. देशमुख, डॉ. रजनी पी. के., डॉ. एस. व्ही. शिंदे, डॉ. एस. एस. सोनार, डॉ. नरेंद्र देवरे, डॉ. महेश कोलते, डॉ. वर्षा हरपाळे, डॉ. एस. यू. भंडारी, डॉ. रोशनी राऊत, विभाग प्रमुख डॉ. सोनाली पाटील, डॉ. एस. एस. सांबरे, डॉ. ए. डी. ठाकरे, डॉ. जे. व्ही. कट्टी, डॉ. ए. के. गायकवाड, डॉ. एस. बी. माटेकर, डॉ. पी. आर. काळे, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी सांगितले की, जगभर सर्वत्र एआय ची चर्चा आहे. यामुळे गुंतवणूक आणि रोजगार संधी वाढणार आहे. परंतु यासाठी प्रथम आपण उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य प्राप्त करून स्वतःला सक्षम केले पाहिजे. याची जबाबदारी घेण्यास पीसीईटी अंतर्गत असणाऱ्या पीसीसीओई महाविद्यालय सह इतर महाविद्यालय देखील परिपूर्ण आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी देखील स्वतःचे योगदान देणे तितकेच आवश्यक आहे.

हेही वाचा –  इंडिगोच्या प्रवाशांना मोठा झटका; लहान मुलांसह अतिरिक्त सामानाचे शुल्क वाढले

शैक्षणिक व सामाजिक शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. लीना शर्मा यांनी देखील विद्यार्थी व पालकांना विद्यार्थी सक्षमीकरण, वैयक्तिक विकास, शैक्षणिक उत्कृष्टता आणि जबाबदार नागरिकत्व या विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास, स्वतःच्या विकासाची जबाबदारी घेण्यास आणि उत्कृष्टते साठी प्रयत्न करण्यास प्रोत्साहित केले.

समारोप सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत संवाद साधत पालक सभा घेण्यात आली. या संवादातून पीसीसीओई मधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थी साहाय्य प्रणाली आणि उपलब्ध संधी बद्दल पालकांना माहिती दिली.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वागत डॉ. लीना शर्मा, सूत्र संचालन प्रा. प्राजक्ता पेंडम आणि प्रा. रेबीका जॉर्ज, आभार प्रा. अंजली साकुरकर, प्रा. दिनेश कुटे यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button