TOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा ‘मराठमोळा’ अंदाज; वडापाववर मारला ताव, फोटो व्हायरल

ब्रिटिश संसदेत पुरस्कार, विराट कोहलीची भेट अन् आता लंडनमध्ये वडापावचा आस्वाद; शिंदेंच्या दौऱ्याची चर्चा

लंडन : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या लंडन दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यातील विविध क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. ब्रिटिश संसदेतील पुरस्कार सोहळा, इंग्रजीतील भाषण आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीसोबतची भेट यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा लंडनमध्ये वडापाव खातानाचा अंदाज समोर आला आहे.

लंडन दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे यांनी वडापावचा आस्वाद घेतला. त्यांचे वडापाव खातानाचे काही फोटो समोर आले असून, त्यांच्यासोबत इतर काही व्यक्तीही दिसत आहेत. परदेश दौऱ्यातही मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीशी असलेली नाळ कायम असल्याचे या फोटोंमधून दिसून येत आहे.

पुरस्कार अन् विराट कोहलीची भेट

एकनाथ शिंदे यांच्या लंडन दौऱ्यात ब्रिटिश संसदेने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी त्यांनी इंग्रजीत भाषणही केले. त्यांच्या भाषणाचीही चर्चा झाली.

याशिवाय शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचीही भेट घेतली. या भेटीत क्रीडा, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि राज्य सरकारच्या विविध योजनांबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा –  ‘MPSC पेपरफुटीत सरकारच्या जवळच्या लोकांचा संबंध’; रोहित पवारांचा गंभीर आरोप

विमान रद्द झाल्याने मुंबईत परतण्यास विलंब

दरम्यान, एकनाथ शिंदे आज सकाळी मुंबईत दाखल होणार होते. मात्र, तांत्रिक कारणामुळे त्यांचे विमान रद्द झाल्याने त्यांच्या मुंबईत परतण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे आजचे त्यांचे नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये वडापावचा आस्वाद घेतानाचे त्यांचे फोटो समोर आल्याने सोशल मीडियावर शिंदेंच्या या ‘मराठमोळ्या अंदाजा’ची चर्चा रंगली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group