Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली पुन्हा हादरली! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक

नवी दिल्ली | देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या धक्कादायक घटनेने हादरली आहे. उत्तर प्रदेशातून आपल्या भावाला भेटण्यासाठी निघालेल्या एका १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर चालत्या स्लीपर कोच बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने बस चालक आणि कंडक्टरने या मुलीला बसमध्ये बसवले आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी काश्मिरी गेट पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी ही उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील रहिवासी आहे.

नेमकी घटना काय घडली?

१६ वर्षांची ही मुलगी ४ ऑगस्टच्या रात्री घरात कोणालाही न सांगता नोएडामध्ये राहणाऱ्या आपल्या चुलत भावाला भेटण्यासाठी निघाली होती. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधार असल्यामुळे तिला बसचा स्टॉप समजला नाही आणि ती ग्रेटर नोएडातील परी चौक येथे चुकून उतरली. परी चौकातून पुढे जाण्यासाठी वाहन शोधत असताना तिला एक स्लीपर बस जाताना दिसली. तिने हात दाखवल्यानंतर बस थांबली. त्यावेळी बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांनी ही बस ‘नोएडा सेक्टर ६३’ च्या दिशेने जात असल्याचे सांगून तिला विश्वासात घेतले व बसमध्ये बसवले.

हेही वाचा

एसआयआर अंतर्गत ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार; जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी

बस सुरू झाल्यानंतर काही वेळातच कंडक्टरने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चालक आणि कंडक्टर या दोघांनीही चालत्या बसमध्ये तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित मुलीने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिला जिवे मारण्याची थेट धमकी दिली. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी पीडितेला काश्मिरी गेट आयएसबीटी (ISBT) जवळील रिंग रोडवर रस्त्यावर फेकून दिले आणि तिथून पळ काढला.

घटनेनंतर पीडितेने तात्काळ काश्मिरी गेट पोलीस ठाणे गाठून आपल्यासोबत घडलेला सर्व भयानक प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तिमारपूर परिसरातून आरोपी कुलदीप आणि संदीप या दोघांनाही अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्लीपर बस जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button