ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरण : पती, सासू-सासरे आणि दिराला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

वाकड : वाकड येथील शिल्पा गवारे आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून पती सचिन गवारे, सासू संजीवनी गवारे, सासरे उत्तम गवारे आणि दिर संदीप गवारे यांना न्यायालयाने ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हे प्रकरण आत्महत्येपुरते मर्यादित नसून हत्येच्या दृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

वाकड परिसरातील शिल्पा गवारे (वय ४२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर त्यांचा भाऊ संतोष कलाटे यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पती, सासू, सासरे आणि दिराविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता.

मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिल्पा गवारे यांच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यानुसार वाकड पोलिसांनीही विविध बाबींची तपासणी सुरू केली आहे.

हेही वाचा –  “माहेरच्या प्रॉपर्टीतून तुझा हिस्सा घे”.. वाकडमध्ये सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

तपासादरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिल्पा गवारे यांनी गळफास घेतल्याचे सांगितले जात असताना त्या वेळी त्यांच्या बेडरूमचे दार उघडे होते. तसेच घटना मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली असताना पती सचिन गवारे घरात असूनही बेडरूममध्ये का नव्हते, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक पंचनाम्यातही या बाबींचा उल्लेख असल्याचे समजते.

याशिवाय, आरोपी पती सचिन गवारे यांच्याविरोधात विवाहापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याची बाबही पोलिस तपासात समोर आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिक गतीने सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.

दरम्यान, न्यायालयाने चारही आरोपींना ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून वाकड पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. तपासातून पुढे कोणती माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button