ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांच्या हाती तिरंगा; पिंपरीत ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा देशभक्तीमय उत्साह

भारतीय जैन संघटना विद्यालयात भव्य तिरंगा वाटप; भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांची प्रमुख उपस्थिती

पिंपरी-चिंचवड | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरातही देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याच अभियानातून प्रेरणा घेत भाजप महिला मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने संत तुकाराम नगर येथील भारतीय जैन संघटना संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत राष्ट्रध्वजांचे वाटप करण्यात आले.

भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. सुजाताताई पालांडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या हाती तिरंगा सुपूर्द केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून दिली.

‘तिरंगा हा देशाचा अभिमान आणि अस्मितेचे प्रतीक’

यावेळी बोलताना शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “राष्ट्रध्वज हा आपल्या देशाचा अभिमान, अस्मिता आणि भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. ‘हर घर तिरंगा’ हे केवळ एक अभियान नसून प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करणारी राष्ट्रीय चळवळ आहे. आज या बालचमूंच्या हातात दिलेला तिरंगा उद्या प्रत्येक घरावर अभिमानाने फडकताना दिसेल. शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविण्याचा महिला मोर्चाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.” तिरंगा हातात मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे भाव उमटले. यावेळी शाळा परिसर *‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘हर घर तिरंगा’*च्या घोषणांनी दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने राष्ट्रध्वज हातात घेत देशभक्तीचा जयघोष केला.

हेही वाचा

“ज्ञानसूर्य” पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

या कार्यक्रमास भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. सुजाताताई पालांडे, संघटन सरचिटणीस मोरेश्वरभाऊ शेडगे, सरचिटणीस मधुकरभाऊ बच्चे, मनोजराव ब्राम्हणकर, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या हातातील तिरंगा आणि त्यांच्या ओठांवरील देशभक्तीच्या घोषणा यामुळे संत तुकाराम नगर परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रप्रेमाचा उत्साह अनुभवायला मिळाला.

“राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि राष्ट्राच्या अस्मितेचा प्रतीक आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाची भावना प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक मनापर्यंत पोहोचत आहे. विद्यार्थ्यांच्या हातात आज दिलेला तिरंगा हा केवळ ध्वज नसून, त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजविण्याचे माध्यम आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भावी पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, एकता आणि कर्तव्यभावनेची जाणीव निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

– शत्रुघ्न (बापू) काटे, शहराध्यक्ष, भाजप पिंपरी-चिंचवड.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button