Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची बैठक संपन्न

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतांना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे; पोलीस सह आयुक्त संजय दराडे

पुणे | शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालकांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे, पुणे शहरचे पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांनी दिले.

पुणे शहर आयुक्तालय येथे आयोजित जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परिवहन, पोलीस आणि शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. दराडे म्हणाले, शाळेत मुलांची ने-आण करणाऱ्या स्कुल बसेस,व्हॅन आदी मुलांकरिता सुरक्षित राहतील, याबाबत दक्षता घ्यावी. यादृष्टीने प्रत्येक वाहनात सीसीटीव्ही बसविणे शासनाने अनिवार्य केले आहे. यापुढे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी सादर करतांना त्यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केलेली असणे अनिवार्य आहे. त्यामुळे वाहनांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आढळून न आल्यास अशा वाहनांवर कारवाई करण्यात येणार येईल.

शालेय परिवहन समितीने स्कूल बस सेवा, सुरक्षा व भाड्याबाबत पालकांच्या तक्रारीचे निराकरण करुन दर तीन महिन्यांनी समितीकडे अहवाल सादर करावा. वाहतूकदार आणि शाळा प्रशासन यांनी स्कूल बसवरील चालक, महिला सहवर्ती किंवा इतर वाहतूक कर्मचाऱ्यांची लेखी नियुक्ती करुन त्यांची चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

ते पुढे म्हणाले, शाळा व्यवस्थापन व वाहतूकदारांनी सर्व वाहतूक कर्मचाऱ्याचे पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल, नियुक्ती पत्र, प्रशिक्षणाचा तपशील, वैद्यकीय प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जतन करुन ठेवावीत. आवश्यकतेनुसार ही कागदपत्रे पोलीस, परिवहन तसेच संबंधीत शासकीय विभागांनी तपासणीकरिता मागणी केल्यास ती तातडीने सादर करावीत.

शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन (स्कुल बसकरिता विनियम) नियम २०११ नुसार वाहनांची बांधणी, वाहनांमध्ये आवश्यक सुरक्षाविषयक बाबी, स्कुल बस परवाना बाबतच्या तरतूदी, चालक, सहायक यांची नियुक्ती, शालेय परिवहन समिती व जिल्हा स्कुल बस सुरक्षितता समितीची स्थापना आदीची पूर्तता होणे आवश्यक आहे. तसेच राज्य शासनाने १६ जुलै २०२६ रोजी नियमांमध्ये स्कुल बस नियमावलीमध्ये सुधारणा करुन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकरिता अतिरिक्त सुरक्षा तरतूदी समाविष्ठ करण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी करावी.

बस कंत्राटदारांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवावी. तसेच विद्यार्थी स्कुल बसमध्ये चढलेल्या व उतरलेल्या वेळेची नोंद ठेवावी. पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक ट्रीपकरीता महिला सहवर्ती अथवा इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अतिरिक्त पर्यवेक्षण ठेवावे. दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता बसमध्ये चढण्या उतरण्याकरिता विशेष सुविधा देण्यात यावी. तसेच आवश्यकतेनुसार त्यांच्या सोबत शिक्षक, समुपदेशक अथवा पालक यांच्या प्रवासाची व्यवस्था करावी.

हेही वाचा

सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्‌घोषणेची मागणी

सर्व शाळा प्रशासनांनी व स्कूल बस मालकांनी मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तीन महिन्यात सर्व बाबींची पूर्तता करावी. या सूचनांचे पालन न करणाऱ्या स्कुल बसेसचा परवाना निलंबित अथवा रद्द करण्यात येईल. स्कुल बस वाहतूकदार यांनी शाळोसोबत अथवा पालकांसोबत
सामान्य मानक करारनामा तयार करुन ज्या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येणार आहे त्यांची यादी सोबत जोडावी.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मार्फत लवकरच स्कुल बस, व्हॅनकरिता भाडेदर निश्चित करण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी ठरवलेल्या किमान भाड्याच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त किंवा कमी आकारणी करता येणार नाही.

शाळा प्रशासनाने https://schoolbussafetypune.org/ या संकेतस्थळावर आपल्या शाळेची आवश्यक ती माहिती भरावी. शिक्षण विभागाने याबाबत सर्व शाळा प्रशासनांना आपल्या स्तरावरून योग्य ते आदेश द्यावेत. अधिक माहितीसाठी वरिष्ठ लिपिक दत्तात्रय गुंजकर (मो.९४२३२६५९५५) यांचेशी संपर्क साधावा.

शालेय वाहनावरील वाहनचालक, वाहक, मदतनीस आदी कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याबाबत सर्व शाळा व्यवस्थापन व बस वाहतूकदार यांनी पोलीस विभागाच्या https://pcs.mahaonline.gov.in/Forms/Home.aspx या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. पुढील कामकाजाच्या सात दिवसांमध्ये पोलीस विभागाकडून याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. तसेच स्कुल बस चालक व सहायक यांची नेत्रतपासणी आणि वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असेही श्री. दराडे यांनी सूचना दिल्या.

शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर परिवहन समिती स्थापन केल्याबाबतचा आढावा घ्यावा. पोलीस विभाग व परिवहन विभागामार्फत वाहनांची विशेष तपासणी मोहिम राबवावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी बैठक घेऊन तसेच शालेय परिवहन समितीने स्कूल बस नियमावलीनुसार काम होत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही श्री. दराडे यांनी दिल्या.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button