Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार’; मंत्री नितेश राणे

मुंबई : मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मरोळ मच्छी मार्केटच्या विकासाबाबत मच्छीमार बांधवांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून आधुनिक, प्रशस्त आणि सर्व आवश्यक सुविधांयुक्त वास्तू उभारण्यात यावी, अशा सूचना मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. या वास्तूचे बांधकाम दर्जेदार आणि दीर्घकालीन उपयोगाच्या दृष्टीने करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत मंत्री राणे बोलत होते. बैठकीस मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, मत्स्योद्योग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश खपले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ युवकांना एकत्र आणणारा दुवा ठरेल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बैठकीत मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणे, आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि आधुनिक पद्धतीने मार्केट विकसित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मच्छीमार बांधवांसाठी उभारण्यात येणारी ही वास्तू अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्यासाठी उपलब्ध जागा आणि तांत्रिक बाबींचा विचार करून चार मजल्यांपेक्षा उंच इमारत उभारण्याच्या मागणीचाही सकारात्मक विचार करावा, असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. मार्केटमध्ये मच्छी विक्रेते, मच्छीमार तसेच ग्राहकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच स्वच्छता, पाणी, साठवणूक, वाहतूक आणि इतर मूलभूत सुविधांचा समावेश करण्याबाबतही त्यांनी भर दिला.

या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, विकासकामे वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री राणे यांनी दिले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button