‘कनेक्टिंग लिंक’ आज ३ तास बंद; ‘हा’ असेल पर्यायी मार्ग!

पुणे | यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Expressway) ‘कनेक्टिंग लिंक’च्या पुणे ते मुंबई वाहणाऱ्या मार्गिकेवर बुधवारी (१२ ऑगस्ट) दुपारी १२ ते ३ या वेळेत देखभाल-दुरुस्तीचे काम आणि मॉक ड्रिल (Mock Drill) आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या तीन तासांच्या कालावधीत कनेक्टिंग लिंकवरील पुणे ते मुंबई दिशेकडील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून पर्यायी वाहतूक
वाहतूक बंदीच्या कालावधीत पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील घाट मार्गातून वळवण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कनेक्टिंग लिंकवरील मुंबईकडून पुण्याकडे येणारी मार्गिका मात्र नेहमीप्रमाणे वाहतुकीसाठी खुली राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वाहनचालकांनी या नियोजित वेळेत पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा
‘युवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रवाशांसाठी महत्त्वाचे आपत्कालीन संपर्क क्रमांक
वाहतुकीदरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाशी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच महामार्ग पोलीस विभागाशी ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





